हंबरून वासाराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्या मन्धी, दिसती माझी माय...
दिसती माझी माय.....
रे हंबरून वासाराले..... ||धृ||
आया बाया सांगत होत्या, होता जवा तहना ,
दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाहणा,
पीठा मन्धी.... पीठा मन्धी... पीठा मन्धी पाणी टाकून मले पाजत जाये,
तवा मला पीठा मन्धी दिसती माझी माय....
दिसती माझी माय....
रे हंबरून वासाराले..... ||१||
काण्या काठ्या येचायला मायी जाई रानी...
पायात नसे वहान तिच्या, फिरे अनवाणी,
काट्या-कुट्या.. र काट्या-कुट्या.. काट्या-कुट्या लाही तीच मानत नसे पाय...
तवा मला काट्या मन्धी दिसती माझी माय....
दिसती माझी माय....
रे हंबरून वासाराले..... ||२ ||
बाप माझा रोज लावी मायेच्या माघ टुमण,
बास झाल सिकशान आता घेउदे हाती काम,
आग शिकूनशान.... ग शिकूनशान.... शिकूनशान कुठ मोठा मास्तर होणार हाय,
तवा मला मास्तर मन्धी दिसती माझी माय....
दिसती माझी माय....
रे हंबरून वासाराले..... ||३||
दारू पिऊन मायेला मारी जवा माझा बाप,
दारू पिऊन मायेला मारी जवा माझा बाप,
थर थर कापे आन लागे तिले धाप....
कसायाच्या... कसायाच्या... कसायाच्या दावणीला बांधली जसी गाय...
तवा मले गायी मन्धी दिसती माझी माय....
दिसती माझी माय....
रे हंबरून वासाराले..... ||४||
अन बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी,
सांग म्हणे, राजा तुझी कवा दिसलं राणी,
अन भरल्या डोळ्यां...अन भरल्या डोळ्यां... भरल्या डोळ्यां कवा पाहीन दुधावरची साय
तवा मले सायी मन्धी दिसती माझी माय....
दिसती माझी माय....
रे हंबरून वासाराले..... ||५||
ग म्हणून म्हणतो आनंदानी भरावी तुझी ओटी,
पुन्हा एकदा जलम घ्यावा माये तुझे पोटी,
ग म्हणून म्हणतो आनंदानी भरावी तुझी ओटी,
पुन्हा एकदा जलम घ्यावा माये तुझे पोटी,
तुझा चरणी.... तुझा चरणी.... तुझा चरणी ठेऊन माह्या धराव तुझ पाय,
तवा मले पाया मन्धी दिसती माझी माय....
दिसती माझी माय....
रे हंबरून वासाराले..... ||६||
र हंबरून वासाराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्या मध्ये, दिसती माझी माय...
दिसती माझी माय..... दिसती माझी माय.....
..... नारायण सुर्वे.
The same poem is sung by Jitendra Joshi and can be found on youtube.com on below link
http://www.youtube.com/watch?v=X-05pGLXQwQ&feature=player_embedded
Great thanks to both of them...... and great salute to "आई" .
टीप : कृपया काही शब्द चुकले असल्यास क्षमा असावी....! हा फक्त एक प्रामाणिक प्रयत्न आहे, ही कविता तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा. धन्यवाद.!!!
No comments:
Post a Comment