पुण्यात बंद..!!! लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविल्याच्या निषेधार्थ पुणे बंद. दुकाने, प्रमुख बाजारपेठा, रिक्षा बंद होत्या. शहरात ५८ बसगाड्यांवर दगडफेक झाली. नुकसान ही भरपूर झाले.... पण कुणाचे??
बस हेच बाकी होत......
पुणे एक शांत शहर... ह्या प्रतिमेला कालिम्बा फासनारे हे राजकारणी. याना लाज का वाटत नाही... का यानि ठरावलच आहे की राजकारणी म्हणजे लाज नसलेले.. असाच "आदर्श" ठेवायचा.
च्यायला त्या पुतळ्याने हयांचे काय वाकडे केल होत? की याना तो पुतळा हलवावा लागला. बहुतेक यांची डोकी ठिकाणावर नाहीत. आता राजकारण्यानकड पुण्यात काही करण्यासाठी उरल नाहीए का?
बर दोष कुणाचा... जाणी पुतळा हलविला त्यांचा? की जाणी बंदचे आवाहन केल त्यांचा? की कार्यकर्त्यांचा... जाणी बसगाड्यांवर दगडफेक केली. दुकाने, प्रमुख बाजारपेठा, रिक्षा बंद करायला लोकाना भाग पाडले....अणि भरपूर नुकसान केले... पण कुणाचे??
मला वाटत जर नेता चुकत असेल तर कार्यकर्त्यांची जवाबदारी आहे, की त्यानी बंड करावे बंद नाही.
No comments:
Post a Comment