श्रीराम आणि रावण युद्धाचा शेवट...
घायाळ झालेला रावण शेवटच्या घटका मोजत होता. आणि इकडे रामाच्या छावणीत श्रीराम लक्ष्मणाला सांगत होते की,
त्वरीत रावणाकडे जा आणि त्याचे शिष्यत्व पत्करून 'काळाचे रहस्य' आत्मसात कर!
रामाच्या त्या बोलण्याने संभ्रमित झालेल्या लक्ष्मणाला शेवटी रामाने अक्षरश: आज्ञा केली की, हे लक्ष्मणा, शिघ्रता कर अन्यथा रावणाच्या अंता बरोबरच ते रहस्य सुध्दा कायमचे अंत पावेल. मरणासन्न रावणाने सुध्दा काही आढेवेढे न घेता, आपल्याकडे आलेल्या लक्ष्मणाची विनंती स्विकारली.
त्याने लक्ष्मणाला सांगितले की त्वरीत पिंपळाची तीन पाने अन एक टोकदार काडी घेऊन ये. लक्ष्मणाने तसे केल्यावर रावणाने पुन्हा सांगितले, आता ते तीनही पाने एकावर एक ठेव आणि एका झटक्यात ती काडी त्या पानांवर आरपार खोच. लक्ष्मणाने तसे केले आणि काय आश्चर्य, काडीचे टोक ज्या पानातून प्रथम स्पर्ष करून गेले ते सोन्याचे झाले, दुसरे रुप्याचे झाले अन तिसरे आहे तसेच राहीले. रावण म्हणाला, हे आहे काळाचे रहस्य.
क्षणमात्र जरी विलंब झाला तरी सोन्याचे रुपे होते.
म्हणून,
जो क्षण हाती लागेल त्याचा क्षणमात्र ही विलंब न करता 'सोने' कर !
No comments:
Post a Comment