Sunday, November 13, 2011

Baby I'm coming home ....

साऱ्या निराशा, क्लेष, वेदना
विसरतो मी तिथे
तिच्या पंखाच्या मउ उबेला
आसुसला मी इथे X 2

इथे धुंद वारा श्वास फुलवी
प्रेमात तुझीया विसरूनी

क्षण संगतीचे मन भुलविती
स्वर्ग सुखांची अनुभूती . . .


There's a place where I love to go
It’s where I'm never alone
You can rest your soul when you're weary and cold
Baby I'm coming home

Leads -


तिच्या शब्दांची ही अदा
अन नयनांची मधुशाला X2

तिच्या अधरांची बोलावणी
दैवी सुखाच्या आठवणी

हे जग चिरंतन तुझामुळे
हे तच आनदानी की स्मित तुझे

तुझिया हृदयी , तुझिया मनी . . .

जगू देना मला

इथे धुंद वारा श्वास फुलवी
प्रेमात तुझीया विसरूनी

क्षण संगतीचे मन भुलविती
स्वर्ग सुखांची अनुभूती . . .

There's a place where I love to go
It's where I'm never alone
You can rest your soul when you're weary and cold
Baby I'm coming home . . .

साऱ्या निराशा, क्लेष, वेदना
विसरतो मी तिथे
तिच्या पंखाच्या मउ उबेला
आसुसला मी इथे ....


http://www.reverbnation.com/artist/artist_songs/353249

Saturday, March 19, 2011

होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्या... !!!

तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्या... !!!

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.

फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणार्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसर्या दिवशी सुरू होणार्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात.

तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्या... !!!

Sunday, January 16, 2011

तू साध घालशील......

तू साध घालशील याची मला खात्री आहे,
तू साध घालशील याची मला खात्री आहे,
म्हणुनच आजही मी तुझी वाट बघत आहे.

तुझ्या प्रत्येक साधेला माझी नक्कीच साथ मिळेल.
फ़क्त एकदा साध घालून तर बघ...
तुला तुझ्या प्रश्नाच उत्तर नक्कीच मिळेल.

तू साध घालशील ना......

Sunday, January 9, 2011

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे...

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
मना सारखा अर्थ लागायचे, अन मना सारखे शब्द ही यायचे.

नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे,
नदी सागराचे किनारे कधी ही मुक्याने किती वेळ बोलायचे,
निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे.

उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
उदासी जरासी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे

असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे,
असे ही दिवसकी उन्हाच्या झळानी जुने पावसाळे नवे व्हायचे,
रुतून रुतुनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे,

मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे,
मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे,
मना भोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे.

आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे,
आता सांझ वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊनी चालायचे,
आता पावलेही दुखू लागले की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे.

----- सौमित्र (किशोर कदम)

महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ......

आज एक लेख वाचनात आला, खुप आवडला.. म्हणुन खास तुमच्या करीता....

आज आम्ही आपल्याशी "मुली" या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील). ;)

तर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प्रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे , एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे "मी नाही इकडची , मी तर तिकडची"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.

चला विषयाकडे वळू... तर पहिला प्रकार आहे "संसारंइतिकर्तव्यं कुमारिका " .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील "बघतोय बघ कसा, लोचट मेला ...." या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा , सांगली , कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही. ;D



दुसरा प्रकार आहे "आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका " ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे "MBCM" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही "cool" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेट, दारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो. म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात. चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा समजणार नाही. :)


तिसरा प्रकार "कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका" ... ह्यांना विशेष धन्यवाद !!! महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच !!! इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापासून सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर "अमेरिकेची आर्थिक परिस्थिती" यासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी. कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....
सांगायची गरज आहे ???ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट !!! 8)



चौथा प्रकार "मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका " ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे...!!! या मुलींना विचाराल "तुझे माझ्यावर प्रेम आहे का ??" तर उत्तर येईल "आईला विचारून सांगते... " यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची !!! या मुली मराठवाड्यात अधिक सापडतात. ???



महाराष्ट्र शासनाप्रमाणे विदर्भाला सापत्न वागणूक देण्याची आमची इच्छा नव्हती. पण विदर्भकन्यांनी "आमच्यावर स्वतंत्र लेख हवा" असा आमच्याकडे हट्ट धरला आहे. शासनाला वेगळा विदर्भ देणं जमेल जमेल .... आम्ही वेगळा लेख लिहिण्याचा आश्वासन जरूर देतो.